अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
मुर्तीजापूरः जुनी वस्ती परिसरातील जुना घरकुल येथे ४४ वर्षिय महिलेचा विनयभंग, शहर पोलीस स्टेशनला तिघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
४४ वर्षिय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ही जुनी वस्ती परिसरातील जुना घरकुल येथे राहत्या घरी असताना मंगळवार दहा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तेथील आरोपी शेख वाजीद शेख शकील, शेख शकील शेख इब्राहिम, शेख नाजीम शेख शकील यांनी संगतमत करून फिर्यादीचा विनयभंग तसेच अक्ष्लील शिवीगाळ करून थाप्पडा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


