नागपूर विभाग प्रतिनीधी:
नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी जय विदर्भ पार्टीची बैठक गिरीपेठ येथील कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
या बैठकीत सर्व लढण्याचा निर्णय घेत ज्या कार्यकर्त्याला निवडणूक लढायची आहे त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर करावे, असे ठरले. निवडणुकीसाठी निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीचे सभापती म्हणून पॉलिट ब्युरोचे ज्येष्ठ सदस्य तात्यासाहेब मत्ते यांची करण्यात आली.
यावेळी अरुण केदार म्हणाले, पार्टीची आर्थिक क्षमता भक्कम नसली आम्ही धनाड्य पक्षाविरोधात पूर्ण ताकतीने निवडणूक लढवू भाजपने गेली १५ वर्षे सत्ता उपभोगली पण शहरातील समस्या कायम आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला महापालिकेच्या सभागृहात जाणे आवश्यक आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय महासचिव विष्णुपंत आष्टीकर,
उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दौलतकर, राजेंद्र सतई, अशोक पाटील, प्रशांत नखाते, रवींद्र भामोडे, शोएब अहमद, प्रशांत जयकुमार, अभिजित बोबडे, प्रदीप सिरस्कर, भरत बविस्टाले, हरिराम नासरे, नीलिमा सेलूकर, चंद्रशेखर शेंडे, सतीश शेंद्रे, सुनील भोसले, डॉ. निलेश वानखेडे, पुष्पा शेवाळे आदी उपस्थित होते.


