
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
डोणगाव पोलिस ठाण्यांतर्गतयेत असलेल्या विठ्ठलवाडी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातामध्ये अमोल जाधव सोमवारी रात्री मृतक मृत्यू झाला, तर एक युवक जखमी झाला आहे. गोहोगाव येथील एका वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.विठ्ठलवाडी येथील अमोल भास्कर जाधव (३५) आणि प्रशांत बबन साळवे हे दोघे दुचाकीने डोणगाव येथूनन विठ्ठलवाडीकडे जात होते. गोहोगावनजीक एका वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडले. यामध्ये अमोल जाधव याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत साळवे हा जखमी झाला आहे. अपघात कसा झाला हेच त्याला अद्याप कळलेले नाही. वृत्त लिहीपर्यंत या अपघात प्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. या वळणावर यापूर्वीही अपघात झाले आहेत. त्यामुळे या अपघात प्रवण स्थळी उपाययोजना करण्याची गरज आहे.…

