महाक्रांती न्यूज नेटवर्क
राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील सावरखेड, विरगांव,वेडशी,वरध या शेत शिवारात रोही, व डुकराच्या अशा जंगली जनावरांचा धुमाकूळ असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुसकान होत असल्याचे दिसून येते, अशाच एका सावरखेड शेतकऱ्याच्या हेमराज कुडमते यांचे शेत जंगलाला लागलेले आहे तर यांच्या शेतातील कपासी व तूर पिकाचे रोही व नीलगाय यांनी संपूर्ण पिकाचे नुसकान केले आहे.
त्या शेतकऱ्यांकडे च्याकडे एकूण नव एकर शेती असून चार ते पाच एकरात पूर्ण कपासीचे नुसकान केले आहे,तर त्याचे कमीत कमी एक ते दीड लाकाचे नुसकान झाले आहे,आज त्या शेतकऱ्यावर कर्जाच्या डोंगर असताना सुद्धा त्या शेतकऱ्याकडे कोणतीही सोय नसताना सुद्धा त्याने आपल्या पत्नीचे पिवळं सोन ठेवून आपली शेती उभी केली होती, पण आता हाती आलेला मालाची संपूर्ण त्या जंगली जनावरमुळे मोठे कपाशी पिकाचे नुसकान केले आहे, त्या शेतकऱ्यावर कर्जाचे संकट ओढवले आहे.त्या सावरखेड शिवरातील सर्व शेतकऱ्याची वनविभाग अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे व नुसकान भरपाई देण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे.

