प्रिय,
नीलि….
सखे आज मी फक्त तुझेच गीत गावे
असे गीत गावे की तुझेच हित व्हावे…..
सोबती तुझ्या जगणे किती आनंदी हे तुला सांगावे
प्रेमविरातील मी एक पान
ह्रदयाशी स्पर्शून बघावे….
तुझ्या मनाशी जेव्हा मी अलगत संपर्क केला
उल्हासित मन माझे झाले
अन आनंद मनी उत्तुंग जाहला…
जगतांना जीवनी मला एकाकी वाटू लागले
आधार तुझा अन प्रेमाचा मिळताच जीवन कमी वाटू लागले…..
सदैव सोबती असावी सुख – दुःखात ही एकच माझी ईच्छा
वाढदिनी तुझ्या एकच मागणे
सदा आनंदी असावी आशिषासंगे ह्याच शुभेच्छा….
——-एल. आशुबाबा..✍🏻


