मुग्ध प्रीतीच्या ओढीने हळूच अवतरला हा दिवस….
तुझ्या सैरभैर मनास मिलणाची वाट दाखविणारा हा दिवस……
उत्तुंग यशाचे कडे घेऊन येणारा हा दिवस….
ध्येयवेड्या मनासं ओलावा देणारा हा दिवस…
फक्त तुलाच घडविण्याच्या ध्यासानं,पंख पसरून येणारा हा दिवस….
थकलेल्या पावलांना बळ देणारा हा दिवस…
प्रेमभावना बहरून आणणारा गोड प्रीतीचा हा दिवस…
तुझ्या जीवनात आशेचा किरण वेचणारा हा दिवस…
असाचं हसत, खेळत,आनंदात दीर्घाआयुष्याची ज्योत बनवून यावा व तुझ्या आयुष्यात प्रकाशाचा वर्षाव व्हावा..ह्या तुझ्या वाढदिनी मंगलमय मनोकामना..
—— *आरिनी ए. लाकडे*.—–

