अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
सायंकाळी सातच्या सुमारास मूर्तिजापूरहून निघालेली अमरावती-शेगाव बस राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेडजवळ पलटी झाली.
या बसमध्ये एकूण 24 प्रवासी प्रवास करत होते. बसचे मोठे नुकसान झाले असून, प्रवासी जखमी झाले आहेत की नाही, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य गोलू डवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

