गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
“आजाद समाज पार्टीचा” प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
आरमोरी : तालुक्यातील कुलकुली नाल्यावर झालेल्या निकृष्ट पुलियाच्या कामाबाबत ग्रामस्थांची तक्रार प्राप्त होताच आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व प्रभारी विनोद मडावी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 आगस्ट रोजी पुलियाची पाहणी करण्यात आली व गावाकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
भेटी दरम्यान प्रवाशी व गावाकऱ्यांशी संवाद साधले असता कळले की, पुलियामुळे बस बंद झाल्याने पालकांना मुलांना शाळेत पाठविण्यास प्रचंड त्रास होत आहे, अनेक पालकांकडे साधन नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गिट्टी न टाकता माती मुरूम टाकल्याने रस्ता वरून गाड्या जाताना अपघात होत आहेत आणि गाड्यांचे नुकसान होत आहे.

📌 ग्रामस्थ व पक्षाचे आरोप
- ठेकेदार व अधिकाऱ्यांचा संगणमताने भ्रष्टाचार झालेला आहे.
- विना रॉयल्टी अवैध मुरूमाचा वापर करण्यात आला.
- गिट्टी न टाकता माती-मुरूमाने केलेले काम.
- रोलर न चालवल्याने असुरक्षित रस्ता. त्यामुळे अपघात व गाड्यांचे नुकसान.
- बस बंद असल्याने शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान.
📌 आजाद समाज पार्टीची भूमिका
- ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.
- जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा.
- ५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल. “निकृष्ट व भ्रष्टाचारपूर्ण काम सहन केले जाणार नाही. प्रशासनाने त्वरीत कारवाई केली नाही तर गावकरी व आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडतील.”असा निर्णय गावातील बैठकी दरम्यान घेण्यात आला.
यावेळी प्रकाश बन्सोड, धनराज दामले, सुरेंद्र वासनिक, राहुल कुकुडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

