कंधार प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे
लोहा येथील किलजे हॉस्पिटल येथे अजितेश मुंडे हा रुग्ण डेंगू या आजारामुळे ऍडमिट होता तशी पेशंटची तब्येत ठीक होती यामुळे डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांच्या मागणीवरून पेशंटला घरून ये जा करण्याची परवानगी दिली परंतु अचानक सकाळी पेशंटला उलटी झाली त्यामुळे पेशंट घेऊन नातेवाईक किल्ले हॉस्पिटल येथे दाखल झाले आणि पुन्हा दवाखान्यात पेशंटला उलटी झाली.
परंतु पेशंटच्या चेहऱ्यावर सिरीयस असल्याची कसलीही हावभाव नव्हती डॉक्टर राऊंड घेत असताना अचानक पेशंटच्या जवळ आले आणि पेशंट पाहिला असता पेशंटच्या पल्स लागत नव्हते त्यामुळे डॉक्टरांना इमर्जन्सी समजल्यामुळे तात्काळ डॉक्टरांनी स्वतः पेशंटला घेऊन ॲम्बुलन्स मध्ये नांदेडला रवाना झाले
नांदेड येथील निरामय रुग्णालयामध्ये पेशंटला ऍडमिट केले त्यानंतर पेशंट थोडाफार स्टेबल झाल्यानंतर डॉक्टर किल्ले यांनी तेथून आपल्या दवाखान्याकडे प्रस्थान केले पेशंटचे नातेवाईकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जर पेशंट च्या जवळ डॉक्टर किलजे साहेब आले नसते तर आमचा पेशंट दगावला असता आम्ही काहीही करू शकलो नसतो डॉक्टर हे आमच्यासाठी देव आहेत
असे उद्गार पेशंटच्या नातेवाईकाने दिले यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर शैलेश किलजे यांचा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंट अजितेश मुंडे, आजोबा केशव गीते, आणि वडील यांनी डॉक्टर शैलेश गिरी साहेबांचा सत्कार केला आणि आभार मानले खरंच डॉक्टर किल्ले साहेब यांच्या प्रयत्नातून डॉक्टर हे देवाचे रूप आहे हे समजून आले असे नातेवाईक म्हणाले.


