प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी विरोधात संविधानचे आर्टिकल २१ चे उल्लंघन व बि एन एस सेक्शन १२३ चा भंग या नुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्याद डॉ. गोपाल बछिरे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांनी पो.स्टे. लोणार येथे दिली.
सविस्तर बातमी अशी की नगरपरिषद लोणार येथील मुख्यअधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे यांनी लोणार शहरास पिन्या जोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावे या करिता शिवसेना उबाठाने अनेक वेळा विनंत्या, निवेदने दिले, मे २०२३ मध्ये आमरण उपोषणे केले तेव्हा मुख्याधिकारी यांनी ८ दिवसातून एकवेळा स्वच्छ व फिल्टर पाणीपुरवठा करूत असे लेखी आश्वासन दिले परंतु जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणाने त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे, दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला महिना दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत या पाण्याचे नमुने
मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनि दि. १२ डिसेंबर २०२३, ८ फेब्रुवारी २०२४, १८ सप्टेंबर २०२४, ४ सप्टेंबर २०२४, ४ मार्च २०२५, १७ एप्रिल २०२५ पाणी नमुन्याचा सूक्ष्मजीविय अहवालानुसार सदरील पाणी हे पिण्यास अयोग्य आहे असे स्पष्ट अहवाल म्हटले आहे.
या कारणाने लोणार शहरातील शेकडो अल्पवयीन मुले वृद्ध हे डायरिया, पोटाचे विकार, व कावीळ सारख्या विकाराणे ग्रस्त झाले आहेत त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्य अधिकारी, पाणीपुरवठा, व आरोग्यसेवा अधिकारी हे
तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहे
यांच्या विरोधात संविधान आर्टिकल २१ उल्लंघन तसेच BNS सेक्शन १२३ (IPC ३२८) नुसार जाणीवपूर्वक विषारी घटक युक्त, दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळून सतत जनसामान्याच्या जीवास दुखापत करणे विरोधात गुन्हा दाखल करून नियमाने कार्यवाही करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, ॲड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे सर तारामती जायभाय लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, शालिनीताई मोरे, अशपाक खान, आत्माराम राजगुरू यांनी दाखल केली आहे.

