निलेश कोकणे:- सातारा जिल्हा प्रतिनिधी
भाद्रपद शुद्ध चतुर्थी निमित्त संपूर्ण भक्तिमय वातावरणात श्री गणरायाचे खूप मोठया थाटामाटात आगमन सोहळा पार पडला. घरगुती गणपतीचे पंचांगमध्ये असणाऱ्या शुभ मुहूर्तावर शुभ आगमन झाले. प्रत्येकाचा चेहऱ्यावर खूप भक्तीचा सुखद आनंद दिसून येतं होता. चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
गेली अनेक दिवस झाले श्री गणेशाच्या आगमनाची लागलेली चाहूल आज पूर्ण झाली. दहिवडी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे काल आज बाजारपेठेत खूप गजबज देखील दिसून आली. गणरायाच्या सजावटीच्या साहित्याने समस्त बाजारपेठ भरलेली होती. गणरायाच्या अतिशय सुबक रेखीव सुंदर मनमोहक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
गणरायाचे वेगवेगळी रूप लक्ष वेधून घेत होती.अगदी सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सगळीकडे गणरायाच्या दिवसभर मिरवणूका चालूच होत्या. काही घरगुती गणपती तर काही छोटी मोठी मंडळाचे गणपती आपल्या ठिकाणी जात होत्या.

