” पैसे दो पैसे दो देवा भाऊ पैसे दो … घोषणांनी जाहीर निषेध !”
“कंत्राटदारांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे जाहीर पाठिंबा !”
:- विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर
विदर्भ विभाग प्रतिनिधी :- युसूफ पठाण
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे एक वर्ष लोटत आहे, राज्याची आर्थिक कुचंबणा सुरू आहे.लाडक्या बहिणींना महिना १५०० रुपये देण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा (जलजिवन मिशन),सार्वजनिक बांधकाम,सामाजिक न्याय व आदिवासी विभागाच्या हजारो कोटींच्या निधीवर एकीकडे डल्ला मारला जात आहे.दुसरीकडे तिजोरीत खडखडाट असल्याने पायाभूत सुविधा विकासकामांची कोटी रुपयांची बिले थकल्याने विदर्भातील कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

यामुळे बरेच शासकीय कंत्राटदार राज्य सरकारच्या विरोधात बंड पुकारून आत्मदहन करण्यास प्रवृत्त होत आहेत.अशा वेळी कंत्राटदाराच्या कामाची थकलेली देयक बिले (रक्कम) फडणवीस सरकार द्यायला तयार नाही,त्यामुळे विदर्भातील शासकीय कंत्राटदारांनी एकत्रित येऊन नागपुर येथिल संविधान चौकात शासनाकडे कामाच्या करोडोंच्या थकीत देयक बिल मागणीसाठी महायुती फडणविस सरकार विरोधात भिक मांगो आंदोलन करून …
पैसे दो पैसे दो …. देवा भाऊ पैसे दो अशा घोषणा दिल्या व जाहीर निषेध केला आहे.

विदर्भातील शासकीय कंत्राटदारांच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे,आम्ही राज्य व केंद्र सरकारच्या निर्लज्ज धोरणाचा तीव्र निषेध करीत आहोत असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून रिपाइं (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर,वर्धा जिल्हा संघटक समाधान पाटील यांनी म्हटले आहे.




