- बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी
: -सुनिल वर्मा
लोणार नगर परिषद ची महावितरणकडून वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांना आता
दणका देत त्यांची वीज जोडणी कापण्याची मोहीम राबविली जात आहे.
यांतर्गत महावितरणचे पथक आता मैदानात उतरले असून कुणाचीही गय न करता थेट वीज जोडणी कापली जात आहे. महावितरणच्या या मोहिमेपासून नगर परिषद ही सुटू शकल्या नाहीत. महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत पथका
कड़ूंन नगर परिषदचे बोरखेड़ी येथिल धरनाची वीज जोडणी कापून टाकली.
गेल्या 15ते 20दिवसापासून लाईट करेक्शन कट केले आहे तरी पण आजपर्यंत नगरपालिका नी काहीच ठोस पाऊले उचलली नाही आहे.
परिणामी लोणार शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकाचे आणखी खेळखंडोबा झाले बोरखेडी धरणाचे एकूण 817820 रुपयांचे वीज बिल थकले आहे. यामुळे महावितरणच्या पथकाने वीज जोडणी कापून टाकली तर एकीकडे पावसामुळे शेतकरी वर्गाच्या पिकाचे आतोनात नुकसान होत असताना भर पावसाळ्यात पण लोणार शहरवासी पिण्याच्या पाण्याची टंचाई शोषत आहे, लोणार शहरात दोन दोन महिन्यांनी नळाला पाणी येत आहे नागरिकांना भर पावसात पाण्याच्या टँकरच आधार घ्यावा लागत आहे .

तर काही नागरिक पावसाचे पाणी झेलत असल्याचे पहावयास मिळत आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे तर अधिकारी वर्गाशी नागरिकांनी संपर्क साधल्याच अधिकारी वर्ग नागरिकांना उलटसुलट उत्तर देत आहे तरी मुख्याधिकारी तथा प्रशासक विभा वराडे यांनी नागरिकांना होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून लवकरात लवकर सुटका द्यावी व संबंधित अधिकारी वर्गाशी कानउघडणी करावी ही मागणी जनतेतून करण्यात येत आहे
कार्यालयीन वेळेत तब्येती चे कारण सांगुन कमी वेळ कार्यालयात हजर राहणाऱ्या मुख्यधिकारी तथा प्रशासक यांच्या मनमानी कारभारामुळे नगरपरिषद ची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
— शुभम बनमेरू
शहर अध्यक्ष, भाजप लोणार


