महाक्रांती न्यूज नेटवर्क
- प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला प्रवेश…

किन्हवली विभागातील अस्नोली येथील युवा कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) शहापूर तालुका उपाध्यक्ष बळीराम दिनकर यांनी आपल्या समर्थकासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, सोमवारी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बळीराम दिनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावेळी माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील माजी कार्यसम्राट आमदार पांडुरंग बरोरा भाजपा जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, गणेश राऊत, उपस्थित होते.

अस्नोली येथील बळीराम दिनकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुका उपाध्यक्ष, दिनेश गणपत दिनकर, अरविंद राघो दिनकर, अजय पांडुरंग दिनकर, पंढरी लक्ष्मण दिनकर, गणेश प्रकाश दिनकर, रामदास मनोहर भोईर, सुरेश गणपत मोहपे, दीपक बारकू मुकणे, किशोर बाबू दलाल, मधुकर दामोदर बांगर, व समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यात एक नंबर पक्ष करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याबद्दल माझी आमदार पांडुरंग बरोरा शहापूर तालुका अध्यक्ष कुशल संघटक भास्कर जाधव गणेश राऊत यांचे होत आहे .


