अकोला:भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या “P. A” ची अशी भाषा आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांचा प्रश्न….
अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोला – पोळा हा सण शेतकऱ्यांचा सण असून यामध्ये सर्वधर्मसमभावाचा हा सण आहे परम पारंपारिक पणे साजरा होणार या सणांमध्ये हिंदू मुस्लिम सह सर्वधर्म सर्व जाती-धर्माची लोक या सोहळा मध्ये सहभागी होत असतात परंतु भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांचे तथाकथित
पीए म्हणणारे अक्षय जोशी यांनी पोळा या उत्सवावर बोट ठेवत बीट खाणारे साजिद खान पठाण यांना हिंदूच्या सणांमध्ये का बोलविले असा आरोप करत आयोजक असलेला अनिल मालगे मला शिवीगाळ केली
ही भाजपाची संस्कृती आहे का?
भाजपाच्या अकोला पिआरवो ग्रुप वर अकोल्यातील भाजपाची ज्येष्ठ नेते सह सर्व पत्रकार बांधव आहेत त्या ग्रुप वर त्याने रात्रभर अनिल मालगे उत्तर द्या बीट खाणाऱ्या व जातीवाचक शब्द वापरून अनिल मालगे उत्तर द्या असे वारंवार प्रश्न केले. सोबतच अनिल मालगे यांना शिवीगाळ सुद्धा फोनवर केली याची रितसर तक्रार जुने सर पोलीस स्टेशनला केलेली आहे.
ह्या अक्षय जोशीवर या अगोदर सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमचे नेते अमोल दादा मिटकरी यांच्याबद्दल सुद्धा या अगोदर पोस्ट केलेली आहे अकोला हा सर्वधर्मसमभावाचा जिल्हा आहे आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे लोक आहोत परंतु अक्षय जोशी यांनी आमदार साजिद खान पठाण यांच्या बद्दल आक्षेपार्य पोष्ट केली भारतीय जनता पक्षाचा अल्पसंख्याक मोर्चा आहे यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधव आहेत
तर भाजपा ने खुलासा करावा आरएसएस मध्ये सुद्धा मुस्लिम संघ आहे त्यांनी सुद्धा याचा खुलासा करावा अक्षय जोशी अकोला मध्ये थेड जातिवाद निर्माण करण्याचं काम करत आहे या अगोदर सुद्धा त्यांनी वारंवार अशा प्रकार केले आहेत त्यांच्या विरोधात सध्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे सुरू आहे तरी भारतीय जनता पक्षाने अक्षय जोशी ची हकालपट्टी करावी व खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा संत गाडगेबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल मालगे यांनी केले आहे

