निलेश कोकणे:- सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभहस्ते प्रेम डिजिटल आणि पी एस बुटीपार्लर चे उदघाटन सोहळा संपन्न झाला. श्री सनी साखरे गेली अनेक वर्ष फोटोग्राफी आणि डिजिटल मधील आपल्या कौशल्याने असंख्य ग्राहकांना सेवा देऊन आपली एक अनोखी ओळख निर्माण केली. एक वेगळेपण एक आठवण. एक फोटोग्राफी ची खास खासियत यांच्या कलेमध्ये दिसून येते.
यांची फोटोग्राफी पाहून चक्क मंत्री महोदयांनी सुद्धा आपले फोटो काढून घेतले. आणि अत्याधुनिक फोटो स्टुडिओ ची संपूर्ण पाहणी केली आणि पुढील वाटचालीस श्री सनी साखरे व सौ प्रियाताई यांना शुभेच्छा दिल्या.
समस्त साखरे परिवाराकडून श्री जयकुमार गोरे भाऊ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते…

