गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी: – आशिष लाकडे
गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोड कारगिल चौक ते कॉम्प्लेक्स पर्यंत मोकाट जनावरांचा खुप मोठ्या प्रमाणात हैद्रोस सुरू आहे दोन दिवस अगोदर एक गाय अचानक रस्त्याच्या मधोमध धावून आल्यामुळे एक दुचाकी वाहक गाईला जोरदार धडक दिल्याने अपघात घडून त्या दुचाकी वाहकाला जबर मार बसलं सोबतच गाईला सुध्दा इजा झाली .
दररोज चंद्रपूर रोड, आरमोरी रोड, चामोर्शी रोड, धानोरा रोड वर मोकाट जनावरांचा हैद्रोस सुरूच असते मोकाट जणावरांमुळे अपघात होऊन अनुचित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल .

असा इशारा MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, स्वप्नील साळवे, तौफिक सय्यद, मुन्ना रामटेके, सोहेल शेख, शाहरुख शेख, आदि उपस्थित होते ..

