कंधार प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर कागणे
कंधार तालुक्यातील कौठा येथे मे महिन्यात अवकाळी पाऊस पडून भुईमूग भाजीपाला पिकासह विज पडून जनावरे दगावली शेती नुकसानीची भरपाई मिळाली नाही, विज पडून जनावरे दगावली यांचा तरी भरपाई मिळावी यासाठी शेतकरी तहसील च्या चकरा मारत असल्या तरी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या गलथण कारभाराने दोन महिन्या पासून शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे.
विज पडून जनावरे दगावली मदत काही मिळेणा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा भोगळ्या कारभाराने शेतकरी त्रस्त पहिल्यांदा दाखल केलेली कागदपत्रे गहळा झाल्याचे सांगितले तर दुसरी वेळ कागदपत्रे देऊन सुद्धा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ आपत्ती व्यवस्थापन विभागाचा निष्काळजीपणा दिसतून येत आहे,कंधार महसूल विभागाच्या गलथण काराभाराने सर्वसामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो,असाच काहीसा प्रकार कौठा येथील अल्पभूधारक शेतकरी बसवेश्वर देशमुख हे शेती मशागतीचे काम करत असताना मे महिन्यात अवकाळी पाऊस विज पडून बैल दगावला तर आनंदा मुडकर लक्ष्मण तेलंगे याच्या शेळ्यावर विज पडली घडना घडल्या २४ तासात या गोरगरीब शेतकऱ्यांना तलाठी पशुवैदकीय अधिकार्यांचा अहवाल व इतर कागदपत्रे आपत्ती विभागात दाखल केली,असली तरी कंधार महसूल आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या भोगळ्या कारभाराने शेतकर्याना दोन महिने उलटले तरी अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बसवेश्वर देशमुख याचा उध्दरनिवार्ह हा शेतीवर अवलंबून असून ऐन पेरणी पुढे एक बैल दगावल्याने शेतकर्यास कर्ज काढून दुसरा बैल घ्यावा लागला मात्र शासना कडुन तीन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्याप मदत मिळाली नसल्याने महसूल विभागाच्या भोगळ्या कारभाराने शेतकर्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासन एकीकडे महसूल विभाग उत्कृष्ट काम करत असल्याचे सागितले जात असले तरी कंधार महसूल विभागाच्या कारभाराने सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत. याकडे वरीष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची देऊन सबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मठपती यांची बदली करण्याची मागणी होत आहे.
मी स्वतः तीन वेळा आपत्ती विभागाचे मठपती यांनी सांगितलेले कागदपत्रे दिली,असता प्रत्येक वेळी तुम्हचे पैसे दोन दिवसांत पडतील असे सांगितले असले,तरी तीन महिने झाले,तरी अद्याप मदत मिळाली नाही,मी शेतीचे काम सोडून दररोज कंधार जाऊ शकत नाही,सतत टाळाटाळ करत असल्याचे पशुपालक बसवेश्वर देशमुख यांनी “महाक्रांती न्यूज २४ ( आवाज जनतेचा)” च्या प्रतिनीधी सोबत बोलतांना सांगितले.

