खर्डी प्रतिनिधी:- सगीर शेख
अवघ्या दोन दिवसांवर गणेश उत्सव सण आला असून गणरायाचे आगमन होणार आहे
गणेश उत्सवात दिड दिवस,अडीच दिवस ,पाच दिवस ,अकरा दिवस असे मोठ्या थाटामाटात नदी नाल्यावर गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते यासाठी शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धामणी अंतर्गत जरंडी नदीवर गणपती विसर्जनसाठी गवत व कचरा काढत मैदान मोकळे करण्यासाठी सरपंच सुगंधा अशोक वीर व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोक वीर , सदस्य भारत मांजे, सदस्य सिमा फोडसे,अक्षय भोईर ग्रामपंचायत धामणीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

