निलेश कोकणे:- सातारा जिल्हा प्रतिनिधी
भुरकवडी (तालुका खटाव) येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून उभारण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक उपकेंद्राचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते प्रमुख मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक उपकेंद्रामुळे स्थानिक रहिवाशांना तसेच शेजारील गावातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच त्वरित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.“आरोग्य हीच खरी संपत्ती” या विचाराला अनुसरून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हेच भारतीय जनता पार्टी महायुती सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.भुरकवडी गावचे ग्रामस्थ आणि परिसरातील लोकसंख्येचा विचार करता स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असावे, ही स्थानिक नागरिकांची मागणी होती. या मागणीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी निधी मंजूर करून भव्य अशी उपकेंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपरावजी येळगावकर साहेब, उद्योजक मा. श्री.अंकुश (भाऊ) गोरे, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, भाजप माण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, माण खटाव विधानसभा संयोजक युवानेते विशाल बागल, मंत्रालय कक्षाधिकारी प्रवीण कदम, मा. पंचायत समिती सदस्य भरतशेठ जाधव,, मा. पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे (सरकार), BDO योगेश कदम साहेब , वैद्यकीय अधिकारी शेख साहेब, पत्रकार शरद कदम, युवामोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, संतोष जाधव चेअरमन, बाबासाहेब जाधव, हरिदास बनसोडे, गणेश गोडसे, नगरसेवक सुधीर गोडसे, भुरकवडी गावच्या विद्यमान सरपंच रेश्मा कदम, उपसरपंच शितल कदम व सर्व सदस्या, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस के कदम, प्रविण कदम, छगन कदम, दिलीप गाडे, शामराव कदम, युवानेते मनोजदादा कदम, अविनाश कदम, सुखदेव जाधव, साहेबराव कदम,ग्रामसेविका दिपाली गायकवाड, आशा सेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव,शिवाजी राजगे, संदीप गुरव, अजित माळी, ओंकार इंगळे, सनी इंगळे, सोनू जाधव ,प्रमोद सूर्यवंशी, ओंकार भोसले आदिसह सर्व संस्थेचे आजी – माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, माता_भगिनी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होते.
भुरकवडी येथे कार्यक्रमास उपस्थित होताच माता भगिनींनी राख्या बांधून जयकुमार गोरे यांचे आपुलकीनं औक्षण करून स्वागत केले, त्यावेळी मी मायमाऊलींचा ऋणी आहे. आपल्या बहिणींच्या अपेक्षा, प्रश्न आणि स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. अशी ग्वाही नामदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी दिली.
या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित महिला भगिनींनी व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन स्वीकारून सदर विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत ना . जयकुमार गोरे यांनी आश्वस्त केले.

