अकोला जिल्हा प्रतिनीधी गणेश वाडेकर..
अकोला: लाचखोर टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात..!
अकोल्याच्या मलकापूर नाजिक असलेल्या महावितरणच्या सब सेंटर वरील एका लाचखोर टेक्निशियनला २७, ००० रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडले. संदीप वानखडे असे त्या टेक्निशियनचे नाव असून अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वातील सापळा कारवाई पथकातील संदीप ताले, कृष्णा पळस पगार व प्रदीप गावंडे यांनी ही यशस्वी कारवाई केली असून लाचखोर संदीप वानखडे विरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.


