बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प पाणी वापर संस्थेच्या महासंघाला नुकताच भारतातून पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रोपतीजी मुर्म यांच्या हस्ते महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, व आदी मान्यवर मंडळी यांना प्रधान करण्यात आला. हा आनंद द्विगणित करण्यासाठी हा प्रकल्प अधिक व्यवस्थित सुनियोजित पद्धतीने ज्यांनी मेहनत घेतली व घेत आहे त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने. मेहकर येथे मोठे राम मंदिर या ठिकाणी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, महासंघाचे कार्यकारी संचालक इंजिनीयर र.मा.गट्टानी महासंघाचे माजी सचिव अभियंता नारायण आत्माराम बळी दे.माळी यांच्यासह इतरही सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. म्हणून त्यांच्यासोबतच इतरही अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांची उपस्थिती होती, त्याचबरोबर बबनराव भोसले, मदन इरतकर, विठ्ठल चांगाडे, विजय गिरे, शिवाजी जमधाडे, भागवत तुपकर, सुधाकर खरात, श्याम काटे, यांच्यासह इतरही अधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर महासंघाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


