प्रतिनिधी: – गितेश भोईर
महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण विभाग मार्फत महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे व राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत समावेश असलेल्या ‘सक्षम लोकसंचलित साधन केंद्र, मोखावणे’ (कसारा) ची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा ताराबाई पुराणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडली.

शिरोळ येथील आश्रम शाळा हॉलमध्ये शहापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सक्षम’ची ही सभा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सक्षम च्या व्यवस्थापक व मुख्य संयोजिका श्रीमती छाया परेश पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन सक्षमच्या CLF लेखापाल श्रीमती हर्षला नागरे यांनी केले. परिसरातील सीआरपी सहयोगिनी आणि विविध महिला बचत गटांच्या असंख्य सभासदांनी उपस्थिती दर्शविल्यामुळे हॉल अगदी खचाखच भरला होता.

माजी आ. बरोरा यांनी आपल्या मनोगतातून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मा भास्कर जाधव ज्येष्ठ नेते(भाजप)यांनी महिला ना शुभेच्छा दिल्या ,तसेच शहापूर कृषि विभागाचे महेश म्हारसे, शहापूर उद्योग विकास केंद्र चे श्री. विकास पांडे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला आर्थिक सक्षमीकरण संदर्भातील विविध उपयुक्त योजनांची माहिती दिली. कार्यक्रम दरम्यान बचत गट चालविण्यास आपल्या पत्नीस उत्तम सहकार्य करणारे श्री. शरद पवार, विठ्ठल चौरे आदींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर, मोखावणे ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्री. शरद वेखंडे साहेब, ग्रामपंचायत विहिगावच्या सरपंच सोंगाळ, शिरोळ व ग्रामपंचायत सरपंच सपनाताई, सदस्य भारती पवार, कल्याण कर्जत रेल्वे संघटना अध्यक्ष श्री. राजेश घनघाव साहेब, श्री .हरीभाऊ वेखंडे माजी ग्रा.प सदस्य मोखवणे तसेचशिरोळ पोलिस पाटील श्री. सुनील वसंत वाघचौरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

सक्षम लोकसंचालित साधन केंद्र मध्ये कार्यरत उपजीविका सल्लागार कु. वैभव विजय भोईर, सहयोगिनी सौ. नूतन सुधाकर दलाल व सौ. चंदा सुनील मुसळे तसेच क्रेडिट लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कु. नाजूका पुंडलिक घोडविंदे, सौ. चित्रा लक्ष्मण देसले व सर्व गावच्या समुदाय संसाधन व्यक्ती (सी.आर.पी.) उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहयोगिनी चंदा मुसळे यांनी केले.

