मुंबई प्रतिनिधी :
(सतिश वि.पाटील)
गणेशभक्त ज्या आतुरतेने वाट पाहत होते ती आज पूर्ण झाली बाप्पाची पहीली झलक व कोणत्या स्वरूपात असेल मूर्तीचे स्वरूप हे सर्व गुपित असते.आज संध्याकाळी ती आतुरता प्रत्येक्षात अनेक प्रसार माध्यमातून व युट्यूबर प्रसारित करण्यात आली.मनमोहक स्वरूपात दर्शन झाल्यावर भाविकांत मंगलमय व उत्साहात असा भरगच्च कार्यक्रम मुख दर्शन सोहळ्याचे उद्घाटन झाले.
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आहे. ज्याचं मुखदर्शन घेऊन मन प्रसन्न होतं, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचं दर्शन अवघ्या काही तासात घेता येणार आहे.
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून राजाची पहिली झलक दाखविली जाते. यावेळीही मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. लवकरच भाविकांना लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घडणार आहे.

कधी आणि कुठे होणार लालबागच्या राजाची पहिली झलक
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बुधवार दिनांक २७ ऑगस्ट ते शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या जल्लोषात बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहता येणार आहे. आज रविवार दिनांक २४ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा २०२५ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.

