शहरात सर्वत्र खळबळ
विदर्भ प्रमुख यूसुफ पठान ( हिंगणघाट)
हिंगणघाट शहरात महिलेची हत्या करून जमिनीत
पुरल्याची खळबळ जनक घटना पोळ्याच्या दिवसी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे.मृत्यक महिला माधुरी व आरोप सुभाष वैद्य हे गेल्या ७ वर्षापासून एकत्र राहत असल्याचे सांगण्यात येते आहे. चार दिवसापूर्वी सुभाष याने माधुरीची धारदार शस्त्राने हत्या केली.
जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात हरवली असल्याची तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र मोठे रहस्य समोर आले आहे. हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसीबीच्या साहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नेमका इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला. आणि खड्डा बुजला कसा, याची चौकशी सुरू केली. ज्या जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करण्यात आला. त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आले.
जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचे सांगितले. पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे सांगितले. याशिवाय पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉड च्या माध्यमातून शोध लावला. अखेर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता येलोरा रस्त्यालगत बुजवण्यात आलेल्या खड्ड्याचे खोदकाम पुन्हा सुरू केले. खोदकाम केल्यावर यात महिलेचे प्रेत आढळून आले आहे. रात्री देखील हे खोदकाम आणि तपास सुरू आहे.
यात सुभाष याचा मामा याला पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य हा फरार झाला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी
सुशीलकुमार नायक,पोलिस निरीक्षक देवेंन्र्द ठाकूर,साहाय्यक पोलीसी निरीक्षक,दिपक वानखेडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक थूल, पि एस आय सुनिल राम, पि एस आय अजय अवचट, यांच्यासह सहकारी पोलिसांनी या घटनेत सखोल तपास केला आहे.
महिलेच्या डोक्यावर जखमा असून नेमकी हत्या कोणत्या शस्त्राने केली ही बाब तपासात समोर येणार आहे.

