गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी येथे तान्हा पोळा उत्सव समितीतर्फे दि. 23 ऑगस्ट 2025. शनिवार ला हनुमान मंदिर प्रांगनामध्ये तान्हा पोळा उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. मागील 45 वर्षांपासून अविरत सुरु असणाऱ्या तान्हा पोळ्यामध्ये 600 लाकडी नंदिबैलांनी प्रवेश नोंदविला.
34 बक्षीसांची लय लूट, 600 लाकडी नंदिबैलांना प्रोत्साहन पर बक्षीस तसेच असंख्य प्रेक्षकांची उपस्थिती हे येथील तान्हा पोळ्याचे वैशिष्ट्य आहे. सदर कार्यक्रम तान्हा पोळा उत्सव समितीचे कार्यकर्ते तसेच देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी येथील प्रायोजक याच्या मुळे यशस्वी झाला.

