गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली - बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २४ ऑगस्ट २०२५ ला कमल गणपती सभागृह शांतीनगर भुसावळ येथे होत आहे . या अधिवेशनाचे अध्यक्ष मा . वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ नई दिल्ली हे आहेत . उद्घाटक मा. कॉ . किशोर ढमाले राज्य संघटक सत्यशोधक शेतकरी सभा हे आहेत .
या अधिवेशनात ओबिसींची जातनिहाय जनगणना न करणे हे षडयंत्र आहे . शेतकरी , शेतमजूर , कामगार , . . यांच्यावर गुलामी लादणे , हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून बहुजन समाजाचे आरक्षण उच्चवर्णीयांनी बळकावणे , ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणूका घेतले पाहिजे , अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे . या अधिवेशनाला देशभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .
या अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य बामसेफ व सहयोगी संघटनांनी केले आहे . या अधिवेशनाल गडचिरोली जिल्हयातून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , आरपिआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर , प्रमोद राऊत , दशरथ साखरे , चोखोबा ढवळे , नरेंद्र शेंडे , खेमचंद इंदूरकर , हेमंत बारसागडे , डोमाजी गेडाम , शांतीलाल लाडे , दामोधर शेंडे , पुंडलिक शेंडे , श्रीरंग उंदिरवाडे , तुळशिराम सहारे , प्रेमिला नान्होरीकर , संघमित्रा राजवाडे , डॉ उज्वला शेंडे उपस्थित राहणार आहेत .

