युसूफ पठाण:-प्रतिनीधी वर्धा
वर्ध्याहून नागपूरला जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली ही कार रस्त्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कार मधील तिघांचा मृत्यू झाला . तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना सेलू नागपूर महामार्गावर खडकी नजीक सामाजिक वनिकारनच्या नर्सरी जवळ बुधवारी ता 20 ला सायंकाळी6 वाजताचे सुमारास घडली घडली.
पंजाब काँलनी वर्धा येथील रहिवासी जुनघरे परिवारातील एकाच कुटुंबातील हे सगळे नागपूर कडे कार क्रमांक एम एच 43 बिएन 1986 ने जात असताना हा भीषण अपघात झाला . या अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिला तर एक विस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू झाला .
मृतांमध्ये सौ वैशाली जयंत जुनघरे वय 47 वर्ष, आस्था जयंत जुनघरे वय 20 वर्ष, सोनू जयंत जुनघरे वय 24 वर्ष यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक रुग्णमित्र व नागरिकांनी गंभीर जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक जयंत वासुदेव जुनघरे वय 55 हे गंभीर जखमी असून त्यांना सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .



