प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार तांडा येथे तीच महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये परिसरातील बंजारा बांधव खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा महोत्सव तरुण मुलीसाठी एक आनंदाचा क्षण व त्यासाठी दहा दिवसापासून घेतलेली मेहनत खूप प्रेरणादायी असते दुरडी मध्ये गहू टाकून उगवले जातात व दहाव्या दिवशी नाईकच्या मानपाणाने पूजा करून जवळील तलावात किंवा नाले वड्यात त्यांचं विसर्जन करतात त्यामध्ये समाजाला व इतर समाजाला हिरवगार राहू दे चांगलं पाणी पडू दे येणार संकट टळू दे असा आशीर्वाद मुलीकडून परमेश्वराला मागितल्या जातो श्रावण महिन्यामध्ये हा तीच महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात

पारंपरिक पद्धतीने बंजारा पेराव घालून जुन्या परंपरेनुसार बंजारा बोली मध्ये गीत घेऊन त्यासाठी परिसरातील व गावागावातील पाहुणे मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तांड्यामधून निघालेली मिरवणूक ही इरतकर नगर येथील तलावामध्ये नेऊन संपन्न झाली यासाठी तांड्यातील लक्ष्मण नायक संतोष कारभारी, बंजारा समाजाचे नेते भारत भाऊ राठोड, सतीश भाऊ राठोड, बाबूसिंग जाधव, संजय चव्हाण , विष्णू भाऊ राठोड, बळीराम राठोड, विठ्ठल राठोड, साहेबराव राठोड, श्रीराम राठोड , उद्धव राठोड ,गजानन चव्हाण ,धर्मा जाधव ,प्रल्हाद पवार ,प्रकाश जाधव ,हरी आडे, धनु राठोड, शंकर जाधव, नवल पवार ,गोवर्धन राठोड ,नामदेव चव्हाण, बाबुसिंग जाधव ,गणेश जाधव ,सदाशिव जाधव, कैलास चव्हाण, नामदेव राठोड,तरुण मित्र मंडळ महिला मंडळ सर्व खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

