खर्डी प्रतिनिधी :- सगीर शेख
अतिवृष्टीमुळे शहापूर शहरात संपूर्ण रस्ते हे खड्डेमय झाले त्यामुळे वाहने तसेच लोकांना पायी चालताना कसरत करावी या संदर्भात मनसे शहापूर शहर उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र दिले आहे येणाऱ्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांची गैरसोय होऊ नये शहापूर शहरात लवकरात लवकर खड्डे भरण्यात यावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम यांना देण्यात आले
यावेळी जिल्हा सचिव श्री राकेश वारघडे ,उपजिल्हाध्यक्ष श्री दिलीप भोपतराव , महिला सेना उपजिल्हा अध्यक्ष सासे ताई , जिल्हा सचिव सुजाता केदारे ताई ,तालुका अध्यक्ष सविता ताई गोणे, शहर अध्यक्ष विनोद पाठारी, उपशहर अध्यक्ष किशोर गारुडकर,सौ कोमल गारुडकर उपस्थित होते.


