निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व गतीकरणासाठी सविस्तर चर्चा झाली.
विकास प्रकल्प
म्हसवड MIDC ला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळणे.
तसेच नाईकबोमवाडी MIDC ला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळणे.
नव्याने निर्माण होत असलेल्या आणि फलटण तालुक्याच्या लगतून जाणाऱ्या मुंबई बंगलोर महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणीचे प्रयोजन.
फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे.
या सर्व कामांसाठी मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा यासाठी निवेदन सादर केले.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार असून त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा केली

