रायगड जिल्हा प्रतिनिधीकैलासराजे घरत
आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी खारपाडा येथे भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. शिवराज मित्र मंडळाचे भव्य कार्यालय येथे नवनियुक्त तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.हनुमान बाबू घरत आणि त्यांच्या टीमचे भव्य दिव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीस ग्रामदैवत श्री हनुमानाचे दर्शन घेतले, शिवस्मारक वाचनालय येथे खारपाडा गावचे ज्येष्ठ नागरिक मा.पी.पी.मोरे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे सक्रिय खजिनदार सामाजिक कार्यकर्ते श्री रत्नाकर काशीराम घरत यांच्या हस्ते शिवपुतळ्यास विजय पुष्पमाला अर्पण करण्यात आली.ह.भ.प केशव महाराज घरत
यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांनी केले. माजी ग्रामपंचायत डॅशिंग सदस्य श्री.प्रशांतदादा घरत यांनी सर्वांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांचे बुके, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष
श्री.हनुमान बाबू घरत यांचा जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदस्य श्री.रत्नाकर काशीराम घरत, सौ.भारतीताई मनोहर पाटील, पत्रकार कैलासराजे घरत यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून खारपाडा गावचे ज्येष्ठ नागरिक मा.पी पी मोरे साहेब, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीज्ञ मनोहर पाटील साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य मा.प्रशांतदादा घरत, श्री.देवराम घरत, श्री.धनंजय घरत, श्री.हरिश्चंद्र घरत, त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.हिरामण घरत, विनायक कोळी, आमचे मार्गदर्शक श्री.कमलाकर बाबू घरत, ह.भ.प केशव महाराज घरत, श्री.अशोक मंग्या पाटील, शेतकरी संघटनेचे सक्रिय सदस्य श्री.दत्तात्रेय जनार्दन घरत, श्री.रघुनाथ नारायण घरत, कु.राज घरत, प्रवीण घरत, संतोष घरत,नितीन घरत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत अतिशय जल्लोषात आणि उत्साहात हा समारंभ पार पडला.


