आज दिनांक 19/08/2025 मौजा रोठा येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत सलग तुर पिकाचे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले असून सदर प्रशिक्षणास बजाज कृषी महाविद्यालय वर्धा येथील वैभव गिरी सर उपस्थित होते व त्यांनी शेतकऱ्यांना तुरीवरील खत व्यवस्थापन, शेंडेखुड,मर रोग व्यवस्थापन व हुमणी अळी इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तसेच सदर प्रशिक्षणास कु.रीना भगत उप कृषि अधिकारी यांनी कृषि विभागातील विविध योजनाची माहिती दिली

जसे महाडिबीटी वरील यांत्रिकीकरण,ड्रीप, स्प्रिंकलर इत्यादी , कु.निकिता खिल्लारे कृषी सेवक, कु.सपना फुकट कृषी सेवक व प्रियांका ताकसांडे स कृषी अधिकारी रोठा यांनी मनरेगा अंतर्गत फळबाग, नाडेप, गांडूळ युनिट जलतारा योजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली त्यावेळेस कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमृतराव शेंद्रे मुकेश अळसपुरे शेतकरी योद्धा अमोल ठाकरे मोहन कुकडे बबन आंबेकर सुरेश खोडे व गावातील शेतकरी उपस्थित होते.

