मोहसीन खान लातूर जिल्हा प्रतिनिधी.
बैठकीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात सुरू असलेल्या विकास कार्याचा विकसित भारत या संकल्पनेशी घट्ट संबंध असून या संकल्पनेला तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना देण्यात आली.
तसेच, विरोधकांकडून नागरिकांमध्ये पसरवण्यात येणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या फेक नॅरेटिव्हला ठामपणे व वस्तुनिष्ठपणे उत्तर देऊन सामान्य जनतेतील संभ्रम दूर करण्यावर भर देण्याविषयी चर्चा झाली.
या प्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. गिरीशजी महाजन, मा. आशिषजी शेलार यांच्यासह कोअर कमिटीतील सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.

