मोहसीन खान:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
सातत्याने होत असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या निलंगा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आज आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान निम्न तेरणा प्रकल्पातून विसर्ग नियंत्रित पद्धतीने नदीपात्रात सोडण्यात यावा. औराद शहाजानी बंधाराच्या खालील डाव्या व उजव्या बाजूस संरक्षण भिंत उभारण्यात यावी, तसेच बंधाराच्या उजव्या तीरावर असलेल्या मंदिरासाठी घाट तयार करण्यात यावा अशा सूचना केली.
याशिवाय मांजरा व तेरणा नदीच्या संगमावर पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पूर संरक्षणाची कामे तात्काळ प्रस्तावित करावीत, असेही सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व उपाययोजना त्वरीत राबविण्याच्या सूचना यावेळी केल्या.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता व प्रशासक डी. ठोंबरे जी, कार्यकारी अभियंता अ.न. पाटील जी, उपविभागीय अधिकारी सि.जे. शेखजी व शाखा अभियंता अ. रा. जोजारे जी आदी उपस्थित होते.

