मराठवाडा विभाग प्रमुख :-(शुभम उत्तरवार)
राज्यात लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी अनेक शासकीय योजना राबविणारे राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांना रक्षाबंधन या बहिण – भावाच्या पवित्र सणानिमित्त लोहा शहरातील ८६१ लाडक्या बहिणीनी त्यांना भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला आघाडीच्या लोहा शहराध्यक्षा सौ. भिकुताई पांडुरंग रहाटकर यांच्या पुढाकारातून लोहा शहरातुन राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांना ८६१ महिला भगिनींनी ८६१ राख्या पाठविल्या.

यावेळी भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, भाजपा महिला मोर्चाच्या लोहा शहराध्यक्षा सौ. भिकुताई पांडुरंग रहाटकर,सौ. प्रिया रुद्रावार, सौ. योगेश्वरी रहाटकर, सौ.निता पडवळकर, सौ.सुनंदा बच्चेवार, सौ. स्वाती चालीकवार सौ.उमा गड्डम, सौ.सविता भोस्कर, सौ.कवटीकवार, सौ. लता किटे, सौ.वैशाली भातलवंडे, सौ. जळके,सौ. सुवर्णकार, सौ.साधना रहाटकर,सौ. सुण्मा किटे, यांच्या सहित मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

