अकोला जिल्हाध्यक्षपदी इमरान खान यांची नियुक्ती
अकोला:-जनकल्याण मराठी पत्रकार संघात राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच 17 ऑगस्ट 2025 नाशिक येथे संपन्न झाले.या अधिवेशनात त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशनात जिल्हा अध्यक्षपदी इमरान खान सरफराज खान यांची नियुक्ती जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी केले आहे.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवराच्या हस्ते पत्रकार बांधवांसाठी विमा योजनेचा शुभारंभ व उपस्थित पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना आकर्षक भेट वस्तू व महिला पत्रकार पदाधिकारी यांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले.यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देविदास बैरागी, महिला विभागाच्या राज्य अध्यक्ष मनिषा पवार, राज्य उपाध्यक्ष सुधिर उमराळकर व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश बागुल यांच्यासह महाराष्ट्रातुन जिल्हा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

