प्रतिनीधी: -मोहसीन खान
लातूर, दि.18 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक 112 मिलीमीटर, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी 25.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – लातूर- 27.9, औसा- 26.9, अहमदपूर- 112, निलंगा- 33.8, उदगीर- 82.5, चाकूर- 60.9, रेणापूर- 41.1, देवणी- 47.4, शिरूर अनंतपाळ- 25.3 आणि जळकोट- 34.4 मिलीमीटर अशी आहे.

