अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार अमोल मिटकरी, यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ प्रशिक्षण शिबिराचे व कार्यकर्ते मेळावा आयोजन १७ ऑगस्ट रोजी वेताळबाबा संस्थान, देवरी फाटा येथे करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते म्हणून मनोज देशमुख युवक प्रदेश उपाध्यक्ष, हे पक्षाची ध्येय धोरणे सामान्य लोकांपर्यंत पोचविणे तर प्रा. सदाशिवराव शेळके जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषय हे समाज निहाय संघटन बांधणी व इंजि. राहुल इंगोले जिल्हाध्यक्ष पदविधर, अकोला हे बुथचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार केले, यावेळी विशेष उपस्थिती म्हणून
आमदार अमोल मिटकरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मो. बदरूजमा जिल्हाध्यक्ष उपस्थित असून काशिराम साबळे प्रदेश सचिव, संध्याताई वाघोडे प्रदेश संघटन सचिव, प्रतिभाताई अवचार जिल्हाध्यक्ष महिला आघाडी,
डॉ. विशाल इंगोले जिल्हाध्यक्ष वैद्यकिय आघाडी, संदिप कुलट जिल्हासंघटक, तालुका अध्यक्ष राजेश भालतिलक, विकास पवार जिल्हा महासचिव,अरविंद पाटील जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी, ज्ञानेश्वर मानकर जिल्हाध्यक्ष सोशल मिडीया, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिलजी मालगे, ज्येष्ठ नेते विजयजी उजवणे,सचिन शिंदे शहर अध्यक्ष अकोट, धिरजदादा गिते तालुकाध्यक्ष युवक, अकोट विधानसभा अध्यक्ष राम वरणकार, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष चेतन फुकट, युवक ता. कार्याध्यक्ष निखिल रोडे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ऋषिकेश अवारे, यांची उपस्थिती होती.. मार्गदर्शन शिबिरात पक्षातील अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होते, अनेक युवकांची उपस्थिती उल्लेखनीय होती, बुथ बांधणी, सामाजिक कार्य, अनेक नवनवीन उपक्रम अश्या अनेक विषयाचे मार्गदर्शन आत्मसात केले,या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले,
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या अकोला पूर्व विधानसभा संघटक पदी सोहेल अली, अकोट ता. उपाध्यक्षपदी अनुरागजी काळे, कुटासा पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी कुलदीप नागरे, चोहोट्टा जिल्हा परिषद सर्कल पदी भुषण हंबर्डे यांची तर रौदळा वैभवजी कराळे, सोशल मीडिया अकोट ता. उपाध्यक्ष पदी आनंदजी नारे, हिवरखेड शहर अध्यक्ष पदी फैझान अली, आदी युवकांचा पक्षप्रवेश व नियुक्ती झाल्या.
अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली :

