(प्रतिनिधी) – बुट्टीबोरी नवीन वस्ती येथील श्रीमती प्रियंका मंगेश कोटमकर यांची पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय-श्री राजेंद्रजी कपोते साहेब व पुणे जिल्हा अध्यक्षः श्री.दत्ता दाखले. यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार मोहन दादा जोशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पोलीस मित्र संघटनेच्या महिला संघटक-नागपूर शहर या पदावर निवड केली आहे.

जुलै२०२५ ते जुलै २०२६ या एक वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.
संघटनेची ध्येय धोरणे जनसामान्यां पर्यंत पोहोचवून संघटनेच्या कार्य विस्तारासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच त्यांना पुढील कार्यासाठी राजकीय,सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


