युसूफ पठाण:- प्रतिनीधी
मोहिनी नगर उद्यान परिसरात माजी नगरसेवक सतीश वैद्य यांच्या प्रयत्नाने तसेच महाराष्ट्र राज्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री श्री पंकज भाऊ भोयर यांच्या विशेष निधीच्या माध्यमातून साकारलेले आकर्षक शेडचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्य मंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री श्री पंकज भाऊ भोयर व माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे, भाजपा जिल्हा महामंत्री श्री जयंत भाऊ कावळे, वर्धा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री विजय जी देशमुख, वर्धा नगरपरिषद माजी उपाध्यक्ष प्रदीप भाऊ ठाकूर, वर्धा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रशांत भाऊ बुर्ले, भाजपा शहर अध्यक्ष निलेश कीटे, बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अटलजी पांडे, गजानन जाचक, अनिल जी दाऊतखानी, अण्णा चांमटकर, कमलताई गिरी, जैन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शेड उभारल्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध उपक्रमांसाठी स्थिर व सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे.
स्योगाभ्यास, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचतगटांच्या बैठकांपासून समाजोपयोगी कार्यक्रम, कीर्तन-प्रवचन, लहान मुलांचे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम असे बहुपयोगी कार्य या शेडमध्ये घेता येणार असून नागरिकांच्या जीवनमानात यामुळे सकारात्मक बदल घडणार आहे. राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच मोहिनी नगरमध्ये आगमन झाल्याने डॉ. पंकज भाऊ भोयर यांचा सार्वजनिक सत्कार या प्रसंगी करण्यात आला. विशेषतः मा. नगरसेवक सतीश वैद्य यांनी प्रभागातील विकास कार्यात केलेल्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. त्यांच्या अथक धडपडीमुळे नागरिकांचे प्रश्न व मागण्या थेट राज्यमंत्रीसाहेबांपर्यंत पोहोचल्या आणि त्यातूनच हा उपक्रम साकार झाला.जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, विकासकामांच्या माध्यमातून परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी माजी नगरसेवक सतिश वैद्य हे सदैव तत्पर आहेत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे विशेष परिश्रम झाले. मोहिनी नगरच्या नागरिकांनी या शेडमुळे उद्यानाला एक नवे सौंदर्य लाभले असून हा परिसर आता सांस्कृतिक व सामाजिक चळवळीचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला….

या सोहळ्याला स्थानिक नागरिक, समाजातील मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.याप्रसंगी उपस्थित नरेंद्रजी नरोटे, प्रशांत पुरोहित, ब्रजेश जी पांडे, अतुल आगडे, जिपकाटे ताई, खेडकर ताई, कार्यक्रमाचे संचालन् पल्लवी ताई पुरोहित प्रास्ताविक; धर्मेंद्र जी राठी आभार; सचिन लिखितकर यांनी केले

