युसूफ पठाण:- विदर्भ विभाग प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कलावंत श्री. रवींद्र मोकद्दम यांच्या कुशल हातून महाराष्ट्रातील सर्वात मोठा नंदी घडविण्याचे काम सध्या सुरू आहे. या भव्य नंदीची लांबी सुमारे सात फूट तर रुंदी तब्बल नऊ फूट असून तो पूर्णपणे पोकळ आहे.
या नंदीचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, याचा उपयोग मोठ्या मंदिरांमध्ये दानपेटी म्हणून होऊ शकणार आहे. अनोखी कल्पना आणि कलात्मकतेची जोड देत वर्धा जिल्ह्यातील ही निर्मिती लवकरच महाराष्ट्राचे आकर्षण ठरणार आहे.

