प्रतिनिधी:- सगीर शेख खर्डी
आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेऊ शकणारी महाराष्ट्र सैनिक नावाची ताकद कायम आहे.
त्यामुळेच की काय जेव्हा जेव्हा मराठीचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्र सैनिक राज साहेब ठाकरे नावाच्या ताकतीशी एकनिष्ठ राहतो, ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील बाबू भोईर हा देखील तसाच एक कार्यकर्ता. सर्वसामान्य घरातून असल्याने घरातून कोणताच राजकीय मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले नसल्याने एक चांगलं नेतृत्व लोप पावत आहे.
कुटुंब जबाबदाऱ्या यांच्यामध्ये बाबू इतरांप्रमाणेच अडकून गेला मात्र त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील निष्ठा आणि राज साहेबांवरील प्रेम आजतागायत तसंच आहे. बाबू म्हणतो शरीरावरील टॅटू ही फक्त माझी आठवण आहे ते माझं पक्षावरील आणि माझ्या राज साहेबांवरील प्रेमाचा प्रतीक आहे. पण मी आजपर्यंत जो काही एकनिष्ठ राहिलो त्याच्यामुळे मला माझ्या जीवनात पुन्हा पुन्हा संकट येऊन देखील उभारी घ्यायला ताकद मिळाली आणि मी जे काही करत राहिलो ते कधीही स्वार्थासाठी पदासाठी प्रसिद्धीसाठी केलं नाही.
या आठवणी सांगताना बाबू भोईर नावाचा कार्यकर्ता भावनिक होताना दिसतो.

