कंधार प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे
कंधार पासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव बोरी खुर्द (उमरज बोरी) या नावाने या गावची ओळख आहे येथील गावच्या ग्रामपंचायत चा प्रस्ताव पाठवून तीन वर्षे झाले प्रस्ताव मंजुरी झाली परंतु त्यास आज पर्यंत कुठलीही प्रशासकीय मान्यता आलेली नाही असे असतानाच तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे ग्रामपंचायत इमारत कोसळी ग्रामपंचायतचे प्रतिनिधी रामकिशन अंबादास पंदनवन यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वीच प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळेला झेंडावंदनाचा तीन दिवसाचा पहारा करताना येथील सेवक बळीराम जायभाये झेंड्याची देखरेख करीत होते जर का अशावेळी ही घटना घडली असती तर या अपंग सेवकास जागाही सोडता आली नसती आणि अनर्थ घडला असता याबरोबरच या गावाला जाण्यासाठी रस्ता देखील राहिलेला नाही त्यामुळे या गावातून सर्व लोकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे प्रशासनाला विनंती करत आहेत.
टाहो फोडत आहेत की कुणीतरी आमच्या गावसाठी पुढाकार घेऊन रस्ता देता का हो रस्ता सर्व गावकरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना वारंवार विनंती करत आहेत

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रतिनिधी असे म्हणाले की ग्रामपंचायतच्या नऊ मेंबर सोबतच सरपंच उपसरपंच आणि गावकऱ्यांच्या वतीने आमच्या गावातील समस्यांची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याची वेळीच देखल घेतली नाही तर आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी सामोरे जावे लागेल.
अशा परिस्थितीमध्ये प्रशासन जाऊन तेथील पंचनामा करणार का? गावची परिस्थिती पाहणार आहे का याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे..

