आर्णी तालुका प्रतिनिधी शिवम सोळंके
साकुर:– हे यवतमाळ जिल्ह्याच्या टोकावरील शेवटचे गाव. याच गावातील पैनगंगा नदी नांदेड व यवतमाळ दोन्ही जिल्ह्याची सीमा निश्चित करते. नदी दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अति मुसळधार पाऊस सुरू झाला. शिवाय नदीवरील इसापूर आणि वेणी धरणाचे १० ते १२ गेट सुरू असल्यामुळे नदीचे पाणी भयानक वाढले.
संपूर्ण गावाला पुराचा वेढा बसला रात्रभर लाईट नव्हती आणि नदीचे पाणी वाढण्याची क्षमता एकदम जास्त होती. रातभर गावातील लोकभयभीत होते कुणीच झोपले नाही. गावातील नागरिक प्रत्येक तासाला पाणी पाहायला जायचे. वरचा पाऊस थांबल्यामुळे धीर होता आणि सुदैवाने सकाळी पाणी ओसरले. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली अतोनात नुकसान झाले. गावातील पोलिस पाटील किशोर रामकर व सोबत सरपंच यांनी रातभर जागून गावातील नागरिकांना धीर दिला. रात्री १२ वाजता नायब तहसीलदार व तलाठी यांनी गावाला भेट देऊन लोकांना सूचना दिली आहे

