अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला – बंजारा समाजाच्या तीज महोत्सवात बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा ताई अवचार यांनी वेशभूषा करून बंजारा समाजाच्या सर्व पारंपारिक उत्सवांमध्ये सकाळपासून सहभागी होऊन तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला कातखेड येथील बंजारा समाजाच्या पंचफुलाबाई राठोड,
रुखमाबाई चव्हाण,
रेणुकाबाई जाधव, यमुना आडे,
ताई बाई जाधव,
मंदाबाई राठोड,
फुलाबाई जाधव,
वंदना चव्हाण, मंदाबाई राठोड, वंदनाताई पवार, सुनीताबाई जाधव, आशाबाई राठोड, लक्ष्मीबाई राठोड, विठ्ठल राठोड डफला वादक, जयराम जाधव, नायक गोवर्धन राठोड, बाबू सिंग राठोड
यांच्यासह बंजारा समाजातील शेकडो महिला या तिज महोत्सवात सहभागी झाल्या होत्या यावेळी तीज महोत्सवाचे महत्त्व सौ प्रतिभा अवचार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी विशद करून समाजाचे राष्टापती असलेले योगदान यावेळी व्यक्त केले.
यावेळी बंजारा समाजातील शेकडो महिला सह आजूबाजूच्या गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनिल मालगे यांनी दिली

