उत्सवात मोजकेच कर्मचारी हजर, बाकीचे कर्मचारी गेले कुठे, मुख्याधिकारीच गायब.
लोणार प्रतिनीधी: – सुनील वर्मा
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. येत्या “गोकुळ अष्टमी” दिनांक १५.०८.२०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती आहे.
मान्यावर मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक २८.०७.२०२५ रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने, संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष निमित्त दिनांक १५.०८.२०२५ रोजी राज्यातील प्रत्येक नगर व शहरांमध्ये महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषदा यांनी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मुर्तीची, पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करावा. असे स्पष्ट आदेश असताना मुख्याधिकारी तथा प्रशासक विभा वराडे यांनी शॉर्टकट अवलंबून फक्त वरिष्ठांना दाखविण्यासाठी नगरपालिका पासून काही अंतरावर डोक्यावर खुर्ची घेऊन त्यावर फोटो ठेऊन मिरवणूक काढण्याचा थातुरमातुर देखावा केला जेव्हा की सरकारचे आदेश होते की संपूर्ण गावातून
मिरवणूक काढून उत्सव साजरा करावा या मिरवणूक वेळेस पण दस्तुरखुद स्वतः मुख्याधिकारी तथा प्रशासक विभा वराडे गैरहजर होत्या तर बोटावर मोजण्या इतकाच नगरपालिके चा कर्मचारी वर्ग हजर होता, कार्यालयीन वेळेत पण तब्बेतीचे कारण सांगुन सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्या वर आजपर्यंत कारवाई न झाल्यामुळे शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे तर आता तरी गैरहजर असणाऱ्या मुजोर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्यावर काय कारवाई होणार का हे येणारा काळच ठरवेल.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज हे राज्याचे आराद्य संत असून त्यांची दिंडी काढून त्यांचे विचार जनमाणसात रुजवण्यासाठी शासनाने त्यांच्या 750 व्या जयंती निमित्य ही दिंडी काढण्याचे आदेश 15 दिवस अगोदर देवून देखील नगर पालिका प्रशासनाने हास्यस्पद दिंडी काढली जर नगर पालिकेला खरोखर दिंडी काढायची असती तर त्यांच्या कडे नगर पालिका कर्मचारी, नगर पालिका शाळेचे शिक्षक, नगर पालिका शाळा विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित, भजणी मंडळ जमा करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची 750 वी जयंती उल्का नगरीत इतेहासिक साजरी झाली असती पण तसे केले नाही.

