मित्रांनो,
मी जैन धर्मीय आहे. प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांमध्ये माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणं ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट आहे, आणि माझाही भावनिक सहभाग यामध्ये आहे.
पण एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला आज काही कठोर पण आवश्यक वास्तव सांगावं लागतं आहे…
❌ कबुतरांसाठी दाणे टाकणं बंद का करावं?
- कबुतर हा आपला स्थानिक पक्षी नाही — तो मध्यपूर्वेहून आलेला invasive species आहे.
- प्रकृतीने कबुतर “अतिवाढी” करतो – माणसांकडून भरपूर अन्न मिळालं की त्यांची लोकसंख्या अकारण वाढते.
- त्यांची विष्ठा फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरते – Pigeon Lung Disease, Hypersensitivity Pneumonitis इ.
- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व वाहतूक अडथळे निर्माण होतात
- स्थानिक पक्षी – विशेषतः चिमण्या – हद्दपार होत आहेत
- प्राकृतिक अन्नसाखळी बिघडते, इकोसिस्टीमचा समतोल ढासळतो
- सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका – विशेषतः अॅलर्जी, दमा, वृद्ध आणि लहान मुलांसाठी
- “न खाऊ घातल्यास ते मरतील” ही समजूत चुकीची आहे –
🌍 पृथ्वीवरील लाखो प्रजाती माणसांशिवाय लाखो वर्ष टिकल्या आहेत
🧬 निसर्गाने त्यांना टिकण्याची क्षमता आणि स्वाभाविक संतुलन दिलं आहे
🧭 भावना की विज्ञान?
कबुतर धार्मिक पक्षी नाही आणि तो धार्मिक मुद्दाही नाही.
हा सार्वजनिक आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे, आणि तो त्याच तत्त्वांनुसार हाताळला पाहिजे.
राज्य सेक्युलर आहे.
म्हणून जेव्हा विज्ञान की धर्म हा प्रश्न येईल तेव्हा ते विज्ञानाची निवड करेल.
जेव्हा भावना की आरोग्य हा प्रश्न येईल, तेव्हा ते आरोग्याचं रक्षण करेल.
👉 राज्य सरकारने भावनाताईला गप्प करून, आरोग्यदादाचं ऐकलं पाहिजे.
आणि आपल्यालाही वास्तव स्वीकारायला शिकलं पाहिजे.
⚖️ थोडं logic – थोडं perspective:
🙄 “दाणे न दिल्यास कबुतर मरतील” – असा विचार करणाऱ्यांनी मग
💊 अँटिबायोटिक्स, अँटीव्हायरल, अँटीफंगल्स वापरू नयेत – कारण त्या हजारो जीवाणू, विषाणू, बुरशी मारतात. मग ते “जीवहत्येचं नरसंहार” ठरलं पाहिजे ना?
✅ कबुतरांना न खाऊ घातल्याने त्यांचा नैसर्गिक आहार शोधण्याचा स्वाभाविक प्रवृत्ती वाढते,
✅ त्यांची संख्या नियंत्रणात राहते
✅ आणि निसर्गसाखळी सुरक्षित राहते.
🙏 माझी विनंती:
🌾 श्रद्धा आणि भावना जपून, दाणे टाकणे फक्त परवानगी असलेल्या ठिकाणी आणि मर्यादित प्रमाणातच करूया
🏥 रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यांमध्ये कबुतरांना दाणे टाकणे टाळा
🐦 चिमण्यांना परत आणायचं असेल, तर कबुतरांचा अतिरेक थांबवाच लागेल
🌱 हाच खरा धर्म – जिथे श्रद्धा, विज्ञान आणि सहअस्तित्व एकत्र येतात!
– डॉ. ऋषभ कोठारी

