विदर्भ विभाग प्रतिनिधी: – युसूफ पठाण
जादुटोणा विरोधी कायदा आरोपींवर दाखल करा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी……
नुकतेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली गावाजवळील गोविंदपुर येथील महेन्द्र सांबरे आणी समिक्षा सांबरे यांना विलास भोयर आणी इन्द्रपाल भोयर रा पालोरा ता पारशिवणी जि नागपूर या भामट्यांनी आहे तुमच्या घरात धनाचा हांडा देवघाराजवळ गाडून असल्याने तुम्हाला मुलबाळ होत नाही त्यासाठी पुजा बांधावी लागेल असे त्यांच्या मनात भरवून व हातचलाखीने चमत्कार दाखवून त्यांचा विश्वास संपादीत करून 23 लाख 9 हजार रूपये नगदी व समिक्षाच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला या आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 अनुभुती कलम 2(१) (ख) जादुटोणा विरोधी कायदा अन्तर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच स्पाॅट पंचनामा करून घरातील व शेतातील जमीनितून हातचलाखी करून काढलेले देवी देवतांची धातूच्या मूर्ती,लाल कपडा,दोन तांब्याचे कलश,व नकली चांदिचे बिस्किटे व ईतर पुजेचे साहित्य जप्त करून सर्वांसमक्ष पंचनामा करावा तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून दागीने,रोख रक्कम जप्त करून फिर्यादींना मिळवून द्यावी .

अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट पोलिस स्टेशन तपास अधिकारी एस.पि.आय. संगिता हेलोंडे यांच्याकडे दि१० ऑगस्टला केलीयावेळी हिंगणघाट शाखेचे मार्गदर्शक राजेश धोटे, राज्य व्यसन व प्रबोधन विभागाच्या कार्यवाह सारिका डेहनकर, राज्य प्रशिक्षण विभागाच्या सहकार्यवाह डॉ माधुरी झाडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकाकेच्या जिल्हा कार्यवाह रजनी सुरकार, जिल्हा युवा विभागाचे सहकार्यवाह भिमसेन गोटे हिंगणघाट शाखेचे प्रधान सचिव सुनील कानकाटे, युवा विभागाचे कार्यवाह रोहित धोटे, कार्यकर्ते राजेश डेहनकर, सुरेश मानकर जामुवंत सांबरे यांचा सहभाग होता आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात सर्व सोयी उपलब्ध असतांना काही समस्येचा कार्यकारणभाव माहित होत नाही कधी विज्ञान त्याचे उत्तर देवू शकत नाही पण ते देणारच नाही असेही विज्ञान सांगत नाही त्यामुळे मुलं बाळं न होणे अनेक असाध्य रोग बरे न होणे या कारणांमुळे अनेक लोक ढोंगी बुवा बाबा माता देवी पिर पाद्री,भामटे,जोतिष्य सांगणारे हे लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना शारीरिक, आर्थिक, मानसिक रित्या त्यांची दिशाभूल करून, चिल्लर चमत्कार दाखवून फसवणूक, लुबाडणूक,शोषण करतात हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर येथील महेन्द्र सांबरे व समीक्षा सांबरे हे वडिलोपार्जित शेती करून आनंदाने जगत असताना त्यांना मुल न होण्याचा मानसिकरित्या दु:ख होते
याचाच फायदा विलास भोयर व, इन्द्रपाल भोयर या भामट्यांनी घेतला एक दिवशी नंदीबैल घेवून समिक्षा एकटी घरात आहे असे पाहून पाणी मागितले तोपर्यंत घराचे निरीक्षण केले असता लहान मुलांचे कपडे, फोटो दिसले नाही यावरून बाई तुझ्या लग्नानंतर तुला बाळ झाले नाही असे सांगितल्यावर तिला विश्वास वाटला त्यावरून तुला पुजा बांधवी लागेल त्यासाठी नव हजार रुपये लागतील असे सांगून नंदोरी येथील गायत्री मेडिकल, हिंगणघाट येथून औषध आणून ते सांगितल्या प्रमाणे घे असे सांगितले त्यानुसार पैसे देऊन औषध घेताच त्रास सुरू झाला ते या भामट्यांना फोनवरून सांगताच तुझ्या घरात धन लपलेले आहे अशी थाप देऊन ते काढण्यासाठी दोन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले त्यानुसार पुन्हा दोन लाख रूपये गायत्री मेडिकल येथे देवून औषध घेवून ते घरातील सांगितले जागी खड्डा खोदून त्यात टाटले असता त्यातून आग निर्माण झाली
त्यामुळे अधिक विश्वास बसला मात्र त्रास कमी झाला नाही मग एके दिवशी रात्री बारा एक च्या दरम्यान येवून घरी व शेतात दोन वेळा पुजा करून जमिनीतून एक मोठा तांब्याचा कलश त्यात तिन चांदीचे बिस्किटे अल्पसा छोटा सोन्याचा तुकडा असे हातचलाखी करून काढून ते तपासून पाहण्यास सांगितले ते खरच चांदीचे व सोन्याचा तुकडा होता त्यामुळे अधिक विश्वास बसला नंतर अजूनही त्रास दुर होणार नाही यासाठी ऐकेविस लाख रुपये खर्च येईल असे सांगितले त्यानुसार बळी पडून घरची शेती गहाण ठेवून २१ लाख रुपये सांगितलेल्या नागपूर येथील छत्रपती चौकातील मेडिकल मध्ये जमा करून औषधं घेवून घरी परतले सांगितले प्रमाणे पुजा केली प्रत्येक वेळी पैसे आहे कि नाही यासाठी आणलेले रुपये देव्हा-या समोर पुजा करून ते विडियो काॅल करून दाखविण्यासाठी आग्रह धरायचे नंतर सांगितलेल्या मेडिकल दुकानात जाऊन रक्कम देऊन औषध आणायला सांगायचे त्याचे मात्र बिल द्यायचे नाही
असे करूनही ना बाळ झाले ना समिक्षा घ्या तब्येतीत फरक पडला यावरून पुन्हा संपर्क केला असता मोठा धनाचा हांडा आहे तो त्रास देत आहे त्यासाठी ३६ लाख रुपये खर्च येईल त्या हंड्यात साडेतिन कोटी रूपयांचे सोने चांदी आहे ते तुम्हाला मिळेल पण सर्वस्व गमावून बसलेल्या महेन्द्र सांबरे कडे काही पर्याय नव्हता अशावेळी बहीण भाऊ यांच्या कडून पैसे माग मिळालेल्या धनातून ती वापस करील असे सांग मात्र कोहीणी यावर विश्वास ठेवला नाही .

अखेर शंका आल्याने हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे दि ७ ऑगस्टला तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू करून या आरोपिंचा माग घेत पारशिवणी गाठले तिथे जाऊन माहिती मिळाली कि या भामट्यांनी वाढोडा पोलिस स्टेशन अंतर्गत असाच गुन्हा केल्यामुळे अटक झाली मात्र ८ ऑगस्टलाच त्यांची जमानत झाली व ते फरार झाले लोकांनी अशा भामट्यांना कोणताही प्रतिसाद न देता जवळच्या पोलिस स्टेशन ला किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना द्यावी असेही आवाहन करण्यात आले.

