मोहसीन खान:- लातूर जिल्हा प्रतिनिधी.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी लातूर शहरात आगमन होत आहे.
या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भाजपा लातूर शहर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, देविदासजी काले, शैलेशजी लाहोटी, शैलेशजी गोजुमगुंडे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

